लंडन – विश्वकरंडक 1986 च्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अर्जेंटिनाचा दिवंगत फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाला देण्यात आलेल्या गोल्डन बॉल ट्रॉफीचा लिलावात समावेश करण्यात आला आहे. अगुंटीस ऑक्शन या संस्थेने मंगळवारी ही माहिती दिली. पुढील महिन्यात फ्रान्समध्ये हा लिलाव होणार आहे.
लिलावाता काढण्यात आलेला मॅरोडोनाचा हा पहिला गोल्डन बॉल आहे आणि त्यासाठीची किंमत अजून निश्चित झालेली नाही. मात्र, 6 जून रोजी होणाऱ्या लिलावादरम्यान त्याची किंमत लाखोंमध्ये असण्याची शक्यता आहे.
25 नोव्हेंबर 2020 रोजी मॅराडोना यांचे निधन झाले होते. मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने 1986 चा विश्वकरंडक अंतिम फेरीत पश्चिम जर्मनीचा 3-2 असा पराभव करून जिंकला होता. गोल्डन बॉल ट्रॉफी 1982 च्या विश्वकरंडकापासून सुरू झाली आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी हा एकमेव खेळाडू आहे ज्याने दोनदा गोल्डन ट्रॉफी जिंकली आहे.