Shekhar Suman Joins BJP – अभिनेता आणि टीव्ही पर्सनॅलिटी शेखर सुमन यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि अन्य भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली.
ते म्हणाले की मी हे पाऊल उचलेन याची मला काल पर्यंत कल्पना नव्हती, पण ईश्वरी आदेश आल्यानंतर आज आपण हे पाऊल उचलले आहे असे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की आपण नेमके काय करीत आहोत हे आपल्याला समजत नसते पण काही संकेत मिळतात आणि आपण त्यानुसार काही निर्णय घेतो असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
आपण एका विधायक मानसिकतेतूनहानिर्णय घेतला आहे असेही त्यांनी सांगितले. दरम्यान परवा कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलेल्या राधिका खेडा यांनीही आज भाजप मध्ये प्रवेश केला.