काठमांडू – नेपाळमधील सत्तारुढ आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जनता समाजबादी पार्टी-नेपाळ या पक्षामध्ये फूट पडली आहे. मात्र तरी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या सरकारला काहीही धोका नसल्याचे उपपंतप्रधान आणि जेएसपी-एन पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. आपण परदेशात असताना पक्षात बेकायदेशीरपणे फूट पाडली जाण्याविरोधात न्यायायालयात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये जेएसपी-एन पक्ष हा एक प्रमुख घटक पक्ष आहे. या पक्षाचे नेते अशोक राय यांनी बंडखोरी करून आपला एक स्वतंत्र गट वेगळा केला आहे. या गटाला निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
जेएसपी-एन पक्षाचे बहुतेक सदस्य आपल्याबरोबर असून पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी कमिटीतील आपल्याला दोन-तृतीयांश बहुमत असल्याचा दावा राय यांनी केला आहे. शेर बहादुर देबा यांच्या नेपाळी कॉंग्रेस आणि माधव कुमार नेपाळ यांच्या सीपीएन- युनायटेड सोशॅलिस्ट यांच्याशी आघाडी करून प्रचंड यांचे सराकार पाडणार असल्याची अफवा त्यांनी फेटाळून लावली.
Taliban reject Pakistan’s claim : पाक लष्कराचा ‘तो’ दावा तालिबानने फेटाळला….
पक्ष फुटण्यापूर्वी संसदेच्या २७५ सदस्यीय कनिष्ठ सभागृहात सत्ताधारी आघाडीकडे १५४ जागा होत्या. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १३८ पेक्षा ही संख्या १६ ने जास्त होती.