Kshitij Zarapkar – एकुलती एक, आयडियाची कल्पना यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले ज्येष्ठ अभिनेते क्षितीज झारापकर यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मुंबईतील एका खासगी रुग्णालयात रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मागील अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला.
क्षितीज झारापकर हे उत्तम अभिनेते तर होतेच. शिवाय ते लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी एकुलती एक, आयडियाची कल्पना, गोळाबेरीज, ठेंगा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते हा चर्चा तर होणारच या आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.