IPL 2024 : 4 अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाज; जे आयपीएल 2024 मध्ये करतायेत कहर; लवकरच Team India मध्ये होऊ शकतात सामील…

IPL 2024 Uncapped Indian Pacer : आयपीएल 2024 च्या सुरुवातीला फलंदाजांचे वर्चस्व पूर्णपणे दिसून आले. पण जसजशी स्पर्धा पुढे सरकत गेली तसतशी काही संघांच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. चांगला फॉर्म दाखवणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये अनेक भारतीय अनकॅप्ड गोलंदाजांचाही समावेश आहे. तर आम्ही तुम्हाला अशा चार अनकॅप्ड भारतीय वेगवान गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा भविष्यात टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो.
1. मयंक यादव : आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा मयंक यादव सीझनमध्ये चार सामने खेळला असेल, परंतु त्याने दाखवून दिले आहे की तो टीम इंडियाचा दावेदार आहे. मयंकने त्याच्या वेग आणि उत्कृष्ट लाईन लेन्थने सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र, दुखापतीमुळे तो आतापर्यंत केवळ 4 सामने खेळू शकला आहे.
2. मोहिसन खान : लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहिसन खान गेल्या 3 आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. महोसिन चांगल्या गतीने अचूक गोलंदाजी करतो, त्यामुळे त्याच्यावर हल्ला करणे फलंदाजांसाठी इतके सोपे नसते. या मोसमात मोहिसनने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यात त्याने 9 विकेट घेतल्या आहेत.
3. हर्षित राणा : कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हर्षित राणाने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. हर्षितने आपल्या विविधतेने फलंदाजांना हैराण केले आहे. त्याचा संथ चेंडू वाचणे फलंदाजांसाठी सोपे नाही. चालू मोसमात त्याने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यात त्याने 14 बळी घेतले आहेत.
4. रसिख सलाम डार : दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या रसिक सलाम दारने आपल्या गोलंदाजीने चांगला प्रभाव पाडला आहे. चालू मोसमात त्याने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत अचूक लाईन लेंथने गोलंदाजी केली आहे.





