पिंपरी – पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वकील बार रूममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. दिनकर बारणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी अध्यक्ष अॅड. सचिन थोपटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संविधान व लोकशाहीचे भवितव्य या विषयावर ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. गोरक्ष लोखंडे यांचे व्याख्यान झाले.
संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी 26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या शूरवीरांना व मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
या वेळी पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. सुदाम साने, अॅड. सुनील कडुसकर, अॅड. नारायण रसाळ, मा. उपाध्यक्ष अॅड. प्रतीक जगताप, अॅड. अजित शिनगारे, माजी सचिव अॅड. निखिल बोडके, सभासद अॅड. नारायण थोरात, अॅड. राज जाधव, अॅड. वाकळे, अॅड. मानसी उदासी, अॅड. सारिका भोसले, अॅड. वैष्णवी काकडे, अॅड. विवेक राऊत, अॅड. वैभव कल्याणकर, अॅड. अजिंक्य लोमटे व अनेक वकील बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष अॅड. प्रतीक्षा खिलारी, महिला सचिव अॅड. मोनिका सचवाणी, खजिनदार अॅड. संदीप तापकीर, सदस्य अॅड. अस्मिता पिंगळे, अॅड. दशरथ बावकर, अॅड. फारुख शेख व अॅड. स्वाती गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड डव्होकेटस् बार असोसिएशनचे सचिव अॅड. धनंजय कोकणे यांनी केले. तर आभार सह-सचिव अॅड. उमेश खंदारे यांनी मानले.