IPL 2024, Lucknow Super Giants Vs Rajasthan Royals : आयपीएल 2024 चा 44 वा सामना ‘लखनौ सुपर जायंट्स’ आणि ‘राजस्थान रॉयल्स’ यांच्यात होणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. गुणतालिकेत तो अव्वल स्थानावर आहे.
तर लखनौ चौथ्या क्रमांकावर आहे. लखनौच्या घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी के एल राहुलचा संघ प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. हा सामना एकना स्टेडियमवर होणार आहे.
नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला. राजस्थान कॅप्टन संजू सॅमसन याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स पहिले बॅटिंग करणार आहे.
मयंक यादव लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो. मयंकने आतापर्यंत प्राणघातक गोलंदाजी केली आहे. मात्र दुखापतीमुळे तो बाहेर आहे. काइल मेयर्सला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. रवी बिश्नोई आणि यश ठाकूर यांची जागा जवळपास निश्चित झाली आहे.
क्विंटन डी कॉक संघासाठी सलामी देऊ शकतो. या हंगामात लखनौच्या कामगिरीवर नजर टाकली तर या काळात संघाने 8 सामने खेळले असून 5 सामने जिंकले आहेत. 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
लखनौ-राजस्थान सामन्यासाठी संभाव्य खेळाडू –
लखनऊ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल/काईल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मॅट हेन्री/मोहसिन खान, यश ठाकूर.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.