पुणे : समाजात प्रभाव पाडण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या मुलाला कात्रज परिसरात पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, तसेच तीन काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुलगा कात्रज भागात राहायला असून, त्याची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. मुलाविरुद्ध यापूर्वी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. अल्पवयीन मुलाने एकाकडून पिस्तूल घेतले होते. समाजात प्रभाव पाडण्यासाठी त्याने पिस्तूल घेतले होते.
मुलगा कात्रज तलाव परिसरात थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी विक्रम सावंत, राहुल तांबे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी पराजे-वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने, सहायक निरीक्षक समीर कदम, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, मंगेश पवार, नामदेव रेणुसे यांनी ही कारवाई केली.