संचारबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा
पुणे (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग अटकाव घालण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये यावर पोलीस कटाक्षाने लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली. त्याच्या स्वागतासाठी कारागृहाबाहेर गर्दी करून सोशल डिस्टन्ससिंग चे तीन तेरा वाजविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ११ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाला ठुसे (वय ३९, रा. अष्टापुर, ता. हवेली), गणेश चोंधे (वय ३८, रा. महम्मदवाडी), गणेश काळे (वय ३० रा. वडगाव शेरी), सोपान मडके (वय २८, रा. काळेपडळ), शिरीष कारले (वय २६, रा. पारनेर, जि नगर), दादा गव्हाणे (वय २८) आणि योगेश गव्हाणे (वय २७, दोघे रा. ता. श्रीगोंदा, नगर) , नितीन सोडनवर (वय ३८, रा. बोरीपारधी ता. दौड), संतोष गव्हाणे (वय २८, रा. गव्हाणेवाडी श्रीगोंदा), अंकुश मललाव (वय ४० रा.येरवडा) आणि संदीप जगदाळे ( रा. करडे, ता. शिरूर) यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन रणदिवे यांनी फिर्याद दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात ….
लॉकडाऊन मध्ये वाढ केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदीचा आदेशही लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात खून प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक केलेला आरोपी विष्णू यशवंत जाधव हा राविवारी रात्री येरवडा कारागृहातुन जामीनावर सुटणार होता. त्यामुळे त्याला घेऊन जाण्यासाठी वर नमूद केलेले लोक कारागृहाबाहेर जमले होते.