Lok Sabha Election 2024 । राज्यात सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपावरून सध्या ओढाताण होताना दिसून आली. सत्तेत असणारे शिंदे गट आणि अजित पवार गट काही जागांवर अडून बसल्याचा सध्या चर्चा सुरु होती. त्यातच दोन्ही पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येतंय. अशात आता महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. आज शिवसेना शिंदे गटाने यादी जाहीर केली आहे.
जाहीर केलेल्या यादीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा आजपर्यंत झाली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील याचे संकेत दिले होते.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्री. नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/XYJjTUy0r8
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. त्यात ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नरेश म्हस्केंची लढत राजन विचारेंशी असणार आहे तर श्रीकांत शिंदेंची लढत वैशाली दरेकरांशी असणार आहे.
हे वाचाल का ? दिल्ली-एनसीआरमधील 100 हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, तपास यंत्रणा अलर्ट