अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. श्वेताने दोनदा लग्न केले आणि दोन्ही लग्ने तुटली. तिचा पहिला नवरा राजा चौधरी आणि दुसरा नवरा अभिनव कोहली होता यानंतर आता श्वेता तिवारीचे नाव तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या फहमन खानसोबत जोडले गेले आहे.
श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीने स्वत: दोघांचे अफेअर असल्याचा दावा केला होता. फहमान खान ‘इमली’मध्ये सुंबूल तौकीरसोबत दिसला होता. शोमध्ये सुंबुल तौकीरसोबतची त्याची जोडी खूप आवडली होती आणि दोघे खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र होते.
दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. आता फहमन खानने एका मुलाखतीत सांगितले की, त्याची प्रतिमा कॅसानोवाची आहे, त्यामुळे त्याचे नाव कोणाशीही जोडले जाते. मुलाखतीत फहमन खानला त्याच्याबद्दलच्या अफवांवर विचारण्यात आले. फहमनला विचारण्यात आले की त्याने स्वतःबद्दल कोणती अफवा ऐकली होती ज्यामुळे तो हसला होता? फहमन म्हणाला, “माझ्या श्वेता तिवारीसोबत डेटिंग झाल्याची बातमी. त्या बातम्या ऐकून आम्ही दोघेही खूप हसायचो. हे लोक वेडे आहेत का ? असा प्रश्न आम्हाला पडायचा. ‘ असं म्हणत त्याने उत्तर दिले आहे.
फहमन म्हणाला की, लोक त्याला कॅसानोव्हा मानतात, त्याचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले आहे. अभिनेत्याने सांगितले की, जर कोणाला त्याचा असा विचार करायचा असेल तर समजून घ्या की त्याला या टॅगची कोणतीही अडचण नाही.
श्वेता तिवारीबद्दल बोलायचे झाले तर फहमन खानच्या आधी तिचे नाव भोजपुरी स्टार मनोज तिवारीसोबतही जोडले गेले आहे. श्वेता भारतीय टेलिव्हिजनपूर्वी भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसली आहे. एक काळ असा होता की तिच्या आणि मनोज तिवारीच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अभिनेत्रीने या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले होते.