PM Narendra Modi| महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 1 मे रोजी मुंबईत हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट करत महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट PM Narendra Modi|
पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हंटले की, महाराष्ट्र दिनम्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे. ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे.…
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2024
दरम्यान, महाराष्ट्राच्या स्थापनेला आज 65 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आज संपूर्ण राज्यभरामध्ये उल्हासाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे पलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ 29 आणि 30 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात होते. काल माढा, धाराशिव आणि लातूर या तीन ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा झाल्या होत्या. यावेळी सभेला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. PM Narendra Modi|
हेही वाचा:
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली; म्हणाले…