Sahil Khan| अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) छत्तीसगढमधून साहिल खानला ताब्यात घेतले. तेथून त्याला मुंबईत आणले जाणार आहे. त्याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली होती.
साहिल खान याची अटकपूर्व जामिनची याचिका फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. मुंबई, गोवा, कर्नाटक, हैद्राबाद असा प्रवास करत तो छत्तीसगढमध्ये पोहोचला. मुंबई पोलिसांचे पथकही त्याच्या मागावर होते. हैद्राबादहून साहिल खान हा छत्तीसगड येथील जगदलबपूर येथे आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
“द लायन बुक ॲप” नावाच्या एका ॲपमध्ये साहिल खान हा देखील भागीदारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आल्यानंतर त्याच्यामागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागला होता. यानंतर साहिल खान यांची मुंबई पोलिस आयुक्तालयात चौकशी करण्यात आली होती. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊनच मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने गुन्हा दाखल करून याप्रकरणी तपास सुरू केला होता.
Mumbai Crime Branch’s SIT detained actor Sahil Khan in connection with the Mahadev Betting App case. He has been detained in Chhattisgarh and is being brought to Mumbai: Mumbai Police Sources
(file pic) pic.twitter.com/Z1PSE0SqKt
— ANI (@ANI) April 28, 2024
सहिल खान कोणता आहे आरोप? Sahil Khan|
सहिल खान Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे. त्याच्यावर लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले. ॲपच्या प्रचारासाठी साहिलने सेलिब्रिटींना बोलावून पार्ट्यांचे आयोजन करत असे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
महादेव बेटिंग या ॲपशी संबंधित 67 बेटिंग संकेतस्थळे असून ती सर्व परदेशातून नियंत्रित केली जात असल्याची माहिती समोर आली होती. यात सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले गेले. त्याचप्रमाणे बनावट कागदपत्रांच्या आधारावर उघडलेली 1700 हून अधिक बँक खाती पैसे गोळा करण्यासाठी वापरली गेली. त्यानंतर पैसे हवाला आणि क्रिप्टोकरन्सी वळविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. लवकरच या प्रकरणातील आणखी अनेक महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.
कोण आहे साहिल खान ? Sahil Khan|
अभिनेता साहिल खान त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. ‘एक्सक्यूज मी’ आणि ‘स्टाईल’ सारख्या चित्रपटात त्याने काम केले आहे. मात्र, साहिलला चित्रपटांमध्ये फार यश मिळाले नाही. यानंतर त्याने इंडस्ट्री सोडली आणि तो फिटनेस इन्फ्लुएंसर बनला. साहिल डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी चालवतो, जी फिटनेस सप्लिमेंट्स विकते.
हेही वाचा:
BJP नेत्याचा पक्षाला घरचा आहेर,’मतांसाठी एवढी खालची पातळी गाठलेला पंतप्रधान पाहिला नाही’