Lok Sabha Election 2024| महाविकास आघाडीकडून मुंबईतील सहा उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. महाविकास आघाडीने सहा मराठी तर भाजप-शिंदे गटाचे चार मराठी उमेदवार मैदानात उतरविले आहेत. यात आता कोणाचे नशीब साथ देणार हे 4 जूनला स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुंबईतील सहा मतदार संघासाठी कोणाला संधी देण्यात आली आहे. ते पाहूयात…
महाविकास आघाडीचे उमेदवार Lok Sabha Election 2024|
– दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव सेनेचे उमेदवार आहेत.
– उद्धव ठाकरे गटाकडून दक्षिण मध्य मुंबसाठी अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
– उत्तर-मध्य मुंबईत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड उमेदवार असणार आहेत.
– उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर उमेदवार आहेत
– उत्तर मुंबईत काँग्रेसने भूषण पाटील यांना मेदवारी देण्यात आली आहे.
– उत्तर-पूर्व मुंबईतील उद्धव सेनेचे उमेदवार संजय दिना पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
महायुतीचे उमेदवार Lok Sabha Election 2024|
– भाजपकडून हिंदी भाषिक असलेलेल पीयूष गोयल यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे.
– उत्तर-पूर्व मुंबईतून गुजराती भाषिक असलेल्या मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे.
– अॅड. उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने उमेदवारी दिली आहे.
– शिंदे गटाचे रवींद्र वायकर उत्तर-पश्चिम मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
– दक्षिण-मध्यतून मुंबई राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे.
– दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा:
सलग दुसऱ्या महिन्यात नागरिकांना दिलासा ; आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट