Nashhik Lok Sabha Election 2024| महायुतीच्या जागा वाटपाबाबत नाशिक लोकसभा मतदार संघातील जागेवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. शिंदे गट (शिवसेना) सह राष्ट्रवादीकडून देखील नाशिकमध्ये दावा केला जात होता. अखेर ही जागा शिंदे गटाला मिळाली आहे. शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे. यानंतर नाशिकमध्ये हेमंत गोडसेसह कार्यकर्त्यांकडूंन जल्लोष साजरा केला जात आहे.
लोकसभा निवडणूक – २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/R8Ykv8WUXs
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
हेही वाचा:
ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे; शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा