Delhi-NCR School Bomb Threat । बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे राजधानी दिल्ली आणि नोएडासह एनसीआरमधील अनेक शाळांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळांच्या अधिकृत ईमेल आयडीवर पहाटे ४ वाजता ही धमकी देण्यात आली.
#WATCH | Delhi: On bomb threat to several schools, DCP New Delhi, Devesh Kumar Mahla says, “We’ve checked all the schools and nothing has been found, there is no need to panic.” pic.twitter.com/Kzf9ctXCT8
— ANI (@ANI) May 1, 2024
यांनतर शाळा व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सर्व शाळांचे कॅम्पस रिकामे केले असून सखोल शोधमोहीम सुरू केली आहे. व्यवस्थापनाने पालकांना संदेश पाठवून मुलांना घरी घेऊन जाण्याची विनंती केली. यांनतर काही वेळातच मुलांना शाळेत नेण्यासाठी पालक येऊ लागले. दिल्ली पब्लिक स्कूल, नोएडाच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की त्यांनाही असाच धमकीचा ईमेल आला होता. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने घरी पाठवण्यास सुरुवात केली आहे.’
बुधवारी सकाळी दिल्ली आणि नॅशनल कॅपिटल रिजन (NCR) मधील सुमारे 100 शाळांमध्ये घबराट पसरली होती. शाळांना त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बच्या धमकीचे ईमेल मिळाले होते. धमक्यांमुळे, अधिकाऱ्यांनी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी बाधित शाळांमध्ये तातडीने बॉम्ब पथके तैनात केली.
नोएडा-ग्रेटर नोएडामधील इतर अनेक शाळांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे
मुलांच्या सुरक्षेचा विचार करून ज्या शाळांना धोका नाही अशा शाळांनाही सुटी जाहीर करण्यात आली. एस्टर पब्लिक स्कूल, ग्रेटर नोएडाच्या व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर केली.
Delhi-NCR School Bomb Threat । शाळांना धमकीचे आले ‘मेल’
1. द्वारकाची डीपीएस शाळा
2. रोहिणीची डीपीएस शाळा
3. वसंत कुंजची डीपीएस शाळा
4. नोएडाची डीपीएस स्कूल
5. दक्षिण पश्चिम दिल्लीची डीएव्ही शाळा
6. पूर्व दिल्लीची डीएव्ही शाळा
7. पितामपुराची DAV शाळा
8. नवी दिल्लीची संस्कृती शाळा
9. मदर मेरी स्कूल, मयूर विहार
10. पुष्प विहारची एमिटी स्कूल
11. नजफगढची ग्रीन व्हॅली शाळा
हे वाचले का ? अजित पवार शरद पवारांकडे परत आले तर काय? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलं…