किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

पिंपरी – जिम मधील ट्रेनरवरून झालेल्या वादातून चार ते पाच जणांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना थेरगाव येथे शनिवारी (दि.30) घडली.

आदित्य नामदेव बांगर (वय-18 रा. काळेवाडी) रोहन गाडे, बबलु गाडे व त्यांच्या सोबत आलेल्या चार मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील स्कायफीट जिममध्ये असलेल्या ट्रेनरवरून झालेल्या वादातून रोहन व त्याच्या साथीदारांनी शिवगाळ करत फिर्यादीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.