IPL 2024, LSG vs MI Live Score Updates : आयपीएलमध्ये आज मंगळवारी संध्याकाळी 7.30 लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. आयपीएल 2024 स्पर्धेतील 48 वा हा सामना लखनौच्या होम ग्राउंड एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
लीगमधील उर्वरित सर्व सामने मुंबईसाठी ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीचे आहेत . कारण गेल्या चार सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. सततच्या पराभवांमुळे संघाचे मनोबल खचले आहे. गुणतालिकेत मुंबई 9व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत ते कायम आहेत. त्याचे 10 गुण आहेत. मात्र, गेल्या सामन्यात त्यांनाही राजस्थानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा लखनौ सुपर जायंट्स संघाच्या बाजूनं लागला आहे. ( Lucknow Super Giants win the toss and the hosts will be chasing today ) लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार राहुल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुंबई इंडियन्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील. केएल राहुलने सांगितले की, त्यांचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन बदलांसह उतरला आहे. क्विंटन डी कॉकच्या जागी अर्शिन कुलकर्णीला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर मयंक यादवचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांचा भाग होऊ शकला नाही. याशिवाय मुंबई इंडियन्स एका बदलाने खेळताना दिसणार आहे. ल्यूक वुडच्या जागी गेराल्ड कोएत्झीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to bowl against Mumbai Indians.
Follow the Match ▶️ https://t.co/I8Ttppv2pO#TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/Xy0DcL6by1
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2024
LSG vs MI : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
इम्पॅक्ट सब : नुवान तुषारा, कुमार कार्तिकेय, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, शम्स मुलानी.
लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.
इम्पॅक्ट सब : अर्शीन कुलकर्णी, मणिमरण सिद्धार्थ, कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंग, प्रेरक मंकड.
मागील सामना गमावल्यानंतर दोन्ही संघ येत आहेत. मुंबई इंडियन्सला प्लेऑफसाठी पात्र ठरणे कठीण जात आहे, तर लखनौ अजूनही शर्यतीत आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला येथून सर्व सामने जिंकावे लागतील. अशा स्थितीत दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे.
T20 World Cup 2024 : केएल राहुलला टीम इंडियात नाही मिळाली जागा..! जाणून घ्या, काय आहे मुख्य कारण…
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. यापैकी लखनौने तीन विजय मिळवले आहेत.