EPFO 2023-24 intrest credited: EPFO ने PF वर 8.25 टक्के व्याज मंजूर केले होते, आता लवकरच करोडो लोकांना वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे. पीएफ खातेधारक त्यांच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत. बऱ्याच लोकांनी EPFO ला टॅग करुन 2023-24 या आर्थिक वर्षाचे व्याज त्यांच्या खात्यात कधी जमा होईल? असे विचारले आहे.
2023-24 चे व्याज खात्यात कधी जमा होणार ?
सोशल मीडिया पोस्टला उत्तर देताना, ईपीएफओने लिहिले होते की, सर्व ईपीएफओ सदस्यांच्या खात्यांमध्ये व्याज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच सर्व सदस्यांना त्यांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम दिसून येईल. व्याज मिळवताना कोणत्याही खातेदाराचे नुकसान होणार नाही याची ईपीएफओ पूर्ण काळजी घेत आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
EPF शिल्लक रक्कम कशी तपासायची ?
– पासबुक तपासण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ पोर्टलवर जावे लागेल. यानंतर, UAN क्रमांक सक्रिय असणे महत्वाचे आहे.
– EPFO च्या https://www.epfindia.gov.in/ वेबसाटवर जा, ‘Our Services’ टॅबवर क्लिक करा आणि ‘for employees’ पर्याय निवडा.
– यानंतर ‘member passbook’ वर क्लिक करा.
– आता तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
– यानंतर तुम्ही तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकाल.
– तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक, सर्व ठेवींचे तपशील यासारख्या गोष्टी तपासण्यास सक्षम असाल.
तुम्ही मिस्ड कॉल आणि एसएमएसद्वारेही तपासू शकता –
-नोंदणीकृत UAN धारक 011-22901406 वर मिस्ड कॉल करून शिल्लक तपासू शकतात.
– मिस्ड कॉल केल्यानंतर, नवीनतम ईपीएफ शिल्लक तुम्हाला एसएमएसद्वारे पाठविली जाईल.
– याशिवाय 7738299899 वर “EPFOHO UAN ENG” एसएमएस पाठवा.