IPL 2024, LSG vs MI Live Score Updates : आयपीएलमध्ये आज मंगळवारी संध्याकाळी 7.30 लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. आयपीएल 2024 स्पर्धेतील 48 वा हा सामना लखनौच्या होम ग्राउंड एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
लीगमधील उर्वरित सर्व सामने मुंबईसाठी ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीचे आहेत . कारण गेल्या चार सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. सततच्या पराभवांमुळे संघाचे मनोबल खचले आहे. गुणतालिकेत मुंबई 9व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत ते कायम आहेत. त्याचे 10 गुण आहेत. मात्र, गेल्या सामन्यात त्यांनाही राजस्थानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा लखनौ सुपर जायंट्स संघाच्या बाजूनं लागला आहे. ( Lucknow Super Giants win the toss and the hosts will be chasing today ) लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार राहुल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मुंबई इंडियन्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
News from the 𝗖𝗶𝘁𝘆 𝗼𝗳 𝗡𝗮𝘄𝗮𝗯𝘀 🗞️
Lucknow Super Giants win the toss and the hosts will be chasing today 🪙#LSGvMI #TATAIPL #IPLonJioCinema pic.twitter.com/aazVPzRti5
— JioCinema (@JioCinema) April 30, 2024
मागील सामना गमावल्यानंतर दोन्ही संघ येत आहेत. मुंबई इंडियन्सला प्लेऑफसाठी पात्र ठरणे कठीण जात आहे, तर लखनौ अजूनही शर्यतीत आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला येथून सर्व सामने जिंकावे लागतील. अशा स्थितीत दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे.
दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. यापैकी लखनौने तीन विजय मिळवले आहेत.