द हेग, (नेदरलॅन्ड) – इस्रायलला जर्मनीकडून दिली जात असलेली लष्करी आणि अन्य स्वरुपाची मदत थांबवावी, अशी निकारागुआ या देशाने केलेली मागणी संयुक्त राष्ट्राच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या मदत एजन्सीकडून गाझामध्ये दिल्या जात असलेल्या मदतीचा आढावा घेण्याची मागणीही जागतिक न्यायालयाने फेटाळली आहे. असे निर्देश देण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर परिस्थिती अद्याप निरमाण झालेली नाही, असे आयसीजेने म्हटले आहे.
गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धादरम्यान इस्रायलला जेमतेम शस्रास्त्रे आणि लष्करी साहित्या पुरवले असल्याचे जर्मनीने या सुनावणीच्यावेळी सांगितले. तत्पूर्वी निकारागुआच्या याचिकेवरील अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात झाली.
निकारागुआ हा फार पूर्वीपासून पॅलेस्टाईनचा मित्र देश आहे. जर्मनी इस्रायलला शस्त्रे निर्यात करत आहे. त्यामुळे तेथील नरसंहाराला मदतच करत असल्याचा आरोप निकारागुआने केला होता. मात्र जर्मनीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे.
हे प्रकरण निकारागुआ आणि जर्मनीतील आहे. इस्रायलला यामध्ये सहभागी करून घेतले गेलेले नाही. गाझामध्ये आपल्या सैन्याकडून नरसंहार केला जात असल्याचा निकारागुआचा दावा इस्रायलने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे.
जर्मनीकडून शस्त्रांची मदत यापुढेही इस्रायलला मिळण्याची शक्याता नाकारता येणार नाही. इस्रायलला मिळणारी हीमदत कायदेशीर मार्गांनी रोखण्याचा निकारागुआचा हा प्राथमिक प्रयत्न होता. हे प्रकरण जर दीर्घकाळ न्यायप्रविष्ट राहणार असेल, तर आजचा निकाल हा या प्रकरणाची प्राथमिक निकाल असेल.