मुंबई: आज पर्यंत ठाकरे घराण्यातली कुणीच निवडणूक लढवली नसून युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणूक लढविणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. त्याच अनुषंगानं आदित्य यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ चाचपण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांनी केलेल्या” आदित्य ठाकरेंमध्ये आम्हला तरुण बाळासाहेब दिसतात” या वक्तव्याने यावर शिक्का मोर्तब झाला आहे.
दरम्यान सध्या आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी ही सर्वच शिसैनिकांची इच्छा आहे. त्यांनी जनाशीर्वाद यात्राकाढली असून तिला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. या प्रतिसादावरून यावर शिक्का मोर्तब झाला असल्याचे राऊत म्हटले आहेत. तसेच “तरुण बाळासाहेब आम्ही पहिले असून, ते जेंव्हा महाराष्ट्र दौरा करत होते तेंव्हा देखील असाच प्रचंड प्रतिसाद मिळत होता. तेंव्हाचे जे वातावरण होते अगदी तसेच वातावरण आता जनाशीर्वाद यात्रेत पाहायला मिळत असल्याने आदित्य यांच्या नेतृत्वावर शिक्का मोर्तब झाला” असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.