Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर उद्या अर्थात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानुसार तिसरा टप्पातील प्रचार रविवारी संपला. तर चौथ्या टप्प्यासाठी प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे.
नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेला अभिनेता गोविंदा याने मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी हजर राहिला होता. यावेळी त्याच्या रोड शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. मात्र गोविंदा ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आला होता त्यांचे नाव विसरला. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं? Lok Sabha Election 2024|
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शोसाठी गोविंदा रविवारी मावळ लोकसभा मतदारसंघात आला होता. यावेळी श्रीरंग बारणे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोविंदाच्या हस्ते झालंरोड शो झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना गोविंदा उपस्थितांची नावं घेत होता. त्यावेळी श्रीरंग बारणे त्याच्या शेजारीच बसले होते.
मात्र गोविंदाला त्याचं नाव आठवत नव्हतं. शेवटी भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी श्रीरंग अप्पा बारणे हे नाव गोविंदाला सांगितले. त्यानंतर गोविंदा श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी आलो आहे असं पत्रकारांना सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन त्याला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केले जात आहे.
मावळमध्ये १३ मे रोजी मतदान Lok Sabha Election 2024|
मावळ मतदारसंघात लोकसभेचं चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मावळमध्ये महायुतीकडून श्रीरंग बारणे यांना आणि महाविकास आघाडी संजोग वाघिरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर होणार आहे. सध्या दोन्ही उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून येथून नेमकं कोण विजयी होणार हे 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचारासाठी गोविंदा आला होता. या सभेदरम्यान गोविंदाने व्यासपीठावर डान्स देखील केला होता. त्याच्या या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
हेही वाचा :
“वडिलांना सोडून जाण्याइतका मी…”, रोहित पवारांचं अजित पवारांना सडेतोड उत्तर