Nashik Loksabha Election| लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. विजय करंजकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाचे विजय करंजकर हे नाराज झाले होते. लोकसभेसाठी विजय करंजकर यांची तयारी सुरू होती. मात्र ऐनवेळी ठाकरे गटकडून राजाभाऊ वाजेंना तिकीट देण्यात आल्यानंतर ते नाराज झाले. ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला आणि मला तिकिट नाकारलं असा आरोपही करंजकर यांनी केला होता.
त्यानंतर करंजकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. करंजकर यांनी अपक्ष अर्ज भरल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात होता. अखेर काल रात्री उशिरा विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी करंजकर म्हणाले की, “शिवसैनिकांचा कैवारी म्हणून एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गेली 13 वर्ष मी शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वाप्रमाणे काम केले. तीन वेळा लोकसभेला इच्छुक होतो. पण ऐनवेळी जे इच्छुक नव्हते त्यांना उमेदवारी देऊन माझ्याशी विश्वासघात केला.” Nashik Loksabha Election|
# Live📡| 06-05-2024 📍 बाळासाहेब भवन, मुंबई 🎥 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे पदाधिकारी यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश https://t.co/zACWBzYRWd
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 5, 2024
पुढे ते म्हणाले, “मातोश्रीच्या आजूबाजूला अशी लोक फिरत आहेत, ते जे घात करत आहेत त्यांना अद्दल घडेल. पडद्याआडचे गद्दार मातोश्रीवर लपलेले आहेत. मात्र आगामी काळात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना अभिप्रेत असलेले काम एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात करून दाखवू,” असा विश्वासही विजय करंजकर यांनी व्यक्त केला. Nashik Loksabha Election|
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय करंजकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केले. तसेच विजय करंजकर यांची संघटनेमध्ये नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख व उपनेते म्हणून जबाबदारी देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.