मुंबई – राज्यातील राजकारणाने एका रात्रीत अचानक सर्व चित्र बदलले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येईल असे वाटत असतानाच आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून शरद पवारांनाही धक्का बसला आहे.
मरे पर्येंत शरद पवार साहेबां सोबत
मी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 23, 2019
याच पार्श्वभूमी जितेंद्र आव्हाड यांनी ‘मी मरेपर्य़ंत शरद पवार साहेबांसोबत’ असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी मी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांना सायंकाळी 4.30 वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.