पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या यूजीसी नेट परीक्षा येत्या १६ जूनऐवजी १८ जून रोजी होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) नेट परीक्षा घेतली जाते. यूपीएससीची परीक्षा १६ जून रोजी आहे. त्याच दिवशी नेट परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांत संभ्रम होता. त्यामुळे नेट परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार १८ जूनला परीक्षा होणार आहे.
जे उमेदवार पदव्युत्तरच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत, त्यांनाही अर्ज करता येईल. पात्रतेमध्ये चार वर्षांचा किंवा आठ-सेमिस्टरचा पदवी प्रोग्राम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचा समावेश आहे.