मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन अचानक निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी काल दिली होती. त्यांच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादीच्या नवीन अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चांवर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याच्या चर्चांवर बोलताना यशोमती ठाकूर यांनी “सुप्रिया सुळे यांना मोठ झालेल बघणं हे सगळ्यांच आवडेल आणि आम्हाला तर नक्कीच आवडेल अशी प्रतिक्रिया यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी “आम्ही जेव्हा सुप्रिया सुळे यांच्याकडे बघतो, आमचे विचार जुळतात, त्या जर पक्षाच्या अध्यक्ष झाल्या तर शेवटी त्या शरद पवार साहेबांची लेक आहे. त्यांच्या जडणघडणीमध्ये त्या लहान्याच्या मोठ्या झाल्या आहे. त्यामुळे एक महाराष्ट्राची लेक मोठी होत असताना सर्वांनाच आवडेल अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांकडूनही सांगण्यात येत आहे. त्यामुळं आता आजच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.