मुंबई – एसएस राजामौली यांचा तेलुगू चित्रपट ‘छत्रपती’ हा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या रिमेकची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटातून कोणताही हिंदी अभिनेता नाही, तर दक्षिणेतील अभिनेता श्रीनिवास बेल्लमकोंडा पदार्पण करत आहे.छत्रपती 12 मे रोजी देशभरात हिंदीत प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्सने भरलेला आहे. श्रीनिवास एक लोकप्रिय तेलुगु अभिनेता आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही.विनायक यांनी केले आहे. तर अभिनेत्री नुसरत भरुचा यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शरद केळकर देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. छत्रपतीची कथा राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती.
2005 मध्ये तेलुगु चित्रपट ‘छत्रपती’ रिलीज झाला होता. एसएस राजामौली यांचा हा चौथा चित्रपट होता. यामध्ये प्रभाससोबत श्रिया सरन मुख्य भूमिकेत होती. ही कथा दोन सावत्र भावांच्या द्वेषावर आधारित आहे. विशेष बाब म्हणजे छत्रपतींचे संगीत आरआरआरसाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या एमएम कीरावानी यांनी दिले होते.मात्र हिंदी स्टारकास्टमध्ये यावेळी बदल करण्यात आले आहेत.
श्रीनिवास बेल्लमकोंडा हा तेलगू निर्माता सुरेश बेल्लमकोंडा यांचा मुलगा आहे. श्रीनिवासने 2014 मध्ये अल्लुडू सीनू या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. छत्रपती हा त्यांचा दहावा चित्रपट आहे. रिमेक असली तरी चित्रपटाच्या ट्रेलरला चाहते बहरभरून प्रेम देताना दिसत आहेत. “छत्रपती हा माझ्यासाठी अनेक अर्थांनी खास चित्रपट आहे. असं श्रीनिवास बेल्लमकोंडा यावेळी म्हणाला.