मुंबई – बॉलिवूड स्टार्सचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. सेलेब्सचे असे अनेक चाहते आहेत जे त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात आणि त्यांना भेटण्यासाठी कधी काय करतील याचा नेम नाही. बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगलाही असा अनुभव आला आहे. हैदराबादमध्ये राकुलला असाच अनुभव आला आहे, तिला एकदा पाहण्यासाठी तिच्या चाहत्याने तब्बल ५ तास प्रवास केला होता.
@Rakulpreet Hello rakul preet mam iam trying to contact but after today’s conversation but i couldn’t Today we could talk properly, mam , thank you mam to give hope that still there is chance to travel with you , to work with you 💞 i hope you will contact me 🥹 pic.twitter.com/pxJD7wlS9C
— Abdul Naveed (@AbdulNaveed7093) April 30, 2023
रकुल नुकतीच हैदराबादला पोहोचली होती. यादरम्यान तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. यातील एका चाहत्याने रकुलला भेटण्यासाठी पाच तासांचा प्रवास केला. जेव्हा रकुलला हे कळले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. यादरम्यान राकुलने या चाहत्यासोबत सेल्फीही काढला.
त्याचबरोबर अभिनेत्रीला भेटल्यानंतर चाहत्याने तिच्यासोबत काढलेला त्याचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच लिहिले, “हॅलो रकुल प्रीत मॅडम मी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे पण आजच्या संभाषणानंतर मी नीट बोलू शकलो नाही मॅडम धन्यवाद मॅडम मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल का? ??? मला आशा आहे की तुम्ही माझ्याशी संपर्क साधाल.’ या चाहत्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, रकुल प्रीत सिंगकडे अनेक चित्रपट आहेत. ती लवकरच कमल हासनसोबत ‘इंडियन 2’, पावेल गुलाटीसोबत ‘आय लव्ह यू’ आणि अनेक अनटाइटेड चित्रपटांमध्ये दिसणार आहे.