मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईनंतर कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजप राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन झाला आहे असे खोचक ट्विट केले आहे.
सचिन सावंत म्हणाले की, ”मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांवरील ED ची कारवाई भाजपा राजकारणातील अंडरवर्ल्ड डॉन झाला आहे हे पुन्हा दर्शवते. पूर्वी डॉन जागा बळकावण्यासाठी गुंड पाठवायचे. मोदी सरकार सत्ता बळकावण्यासाठी तपास यंत्रणा पाठवते. २०१४ ते २२ मध्ये ED ने २९७४ धाडी उगीच टाकल्या नाहीत. यात एकही भाजपाचा नाही खरे तर भाजप अध्यक्षांची आधी चौकशी झाली पाहिजे. वाधवानकडून ₹२० कोटी देणगी कशी मिळाली? हा काळा पैसा नाही? आधुनिक दुर्योधन व दुःशासन लोकशाहीचे वस्त्रहरण करताना संविधानिक संस्था भीष्माचार्य व द्रोणाचार्याप्रमाणे साथ देत आहेत. धृतराष्ट्राप्रमाणे कायदेव्यवस्था वागते हे देशाचे दुर्दैव”
खरे तर भाजप अध्यक्षांची आधी चौकशी झाली पाहिजे. वाधवानकडून ₹२० कोटी देणगी कशी मिळाली? हा काळा पैसा नाही?
आधुनिक दुर्योधन व दुःशासन लोकशाहीचे वस्त्रहरण करताना संविधानिक संस्था भीष्माचार्य व द्रोणाचार्याप्रमाणे साथ देत आहेत. धृतराष्ट्राप्रमाणे कायदेव्यवस्था वागते हे देशाचे दुर्दैव— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 23, 2022
मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. श्रीधर पाटणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ‘पुष्पक ग्रुप’ची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून पुष्पक ग्रुपची 6 कोटी 45 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली.