मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या 11 सदनिकांवर अंमलबजावणी संचनालयाने टाच आणली. या सदनिका सील केल्या असूनही त्याचे बाजारभावाने मुल्य सहा कोटी 45 लाख रुपये आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
श्री उद्धव ठाकरे जी और श्री शरद पवार साहब मैं आप दोनो से डरता नहीं हूँ , मेरा जो करना हैं कर लीजिए !
झूठा केस करना है या मुझपे जितने नोटिस भेजने हैं , आप करिए और भेजिए !
मेरा संघर्ष जारी रहेंगे #MahaVikasAghadi के ख़िलाफ़ !जय भवानी जय शिवाजी!
महादेव@PawarSpeaks @OfficeofUT— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) March 23, 2022
एकीकडे हे प्रकरण सुरू असताना मुंबई महानगरपालिकेने मोहित कंबोजला नोटीस दिली आहे. सांताक्रुझमधील कंबोज याच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा संशय मनपाला आहे. त्यामुळे त्यावर कारवाई होणार आहे.
या कारवाईवरून मोहित कंबोज यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ट्विट केले आहे की,’उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही मी घाबरत नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा. माझं जे काही करायचं ते करा. खोट्या नोटिशी आणि केसेसे करायच्या असतील तर तेही करा, माझा महाविकास आघाडी विरोधातील संघर्ष सुरू राहणार,’ अस म्हणत कंबोज असं आव्हान देणारं ट्वीट मोहित कंबोज यांनी केलं आहे.