न्यूयॉर्क – “नॉर्ड स्ट्रीम’ पाईपलाईनबाबतच्या घातपाताचा तपास करण्यात यावा, अशी मागणी करणारा रशियाचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने नाकारला आहे.
रशिया आणि चीनने मांडलेल्या या प्रस्तावाच्या बाजूने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषेदतील केवळ 3 देशांनी मतदान केले, या ठरावाच्या विरोधात एकाही देशाने मतदान केले नाही. मात्र तब्बल 12 देश तटस्थ राहिले. त्यांनी या प्रस्तावावरील मतदानाच्यावेळी अनुपस्थित राहण्याचा पर्याय स्विकारला. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी किमान 9 मते मिळणे आवश्यक होते. ही मते न मिळाल्यामुले आपोआपच हा प्रस्ताव नामंजूर झाला.
या प्रस्तावाच्या बाजूने रशिया, चीन आणि ब्राझिलने मतदान केले होते. तर अल्बानिया, ब्रिटन, गॅबॉन, घाना, माल्टा, मोझांबिक, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इक्वेडोर आणि जपान या देशांनी अनुपस्थित राहण्याचा पर्याय निवडला. या प्रस्तावाला बेलारुस, व्हेनेझुएला, उत्तर कोरिया, निकारगुआ, सीरिया आणि एरिट्रीया या देशांनीही पाठिंबा दिला होता. मात्र हे देश सुरक्षा परिषदेचे सदस्य नसल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.
आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवटीविरोधात भारताचे योगदान – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
रशियाच्या “नॉर्ड स्ट्रीम 1′ आणि “नॉर्ड स्ट्रीम 2′ या दोन गॅस पाईप लाईनमध्ये झालेल्या स्फोटांमागील घातपाताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील तपास करण्याची मागणी रशियाने या प्रस्तावातून केली होती. या घातपातामागील सूत्रधारांना शोधून काढून, शिक्षा करणे, संबंधित संघटना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे आणि या घातपाताला पाठबळ देणाऱ्या देशांवर कारवीा करण्याची मागणीही या प्रस्तावातून केली गेली होती.