नवी दिल्ली: वाढत्या कोरोना विषाणूच्या संकटावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळामध्ये आतापर्यंत कोणतीही बैठक ठरलेली नाही, तर जगभरात कोविड -१९ च्या जाळ्यात ५ लाख ३० हजार लोकांना या बिमारीची लागण झाली आहे. आणि जवळपास २४ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे युएन सुरक्षा परिषदेत कोरोना’च्या संकटावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच चीन सध्या सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष आहे.
चीन आणि इटलीपेक्षा अमेरिकेत कोरोनाचे जास्त प्रकरणे समोर आले आहेत. ८५,६५३ पेक्षा जास्त प्रकरणे तिथे घडली आहेत. अमेरिकेत कोविड-१९ मुळे सुमारे १३०० लोक मरण पावले आहेत.
चीनच्या १५ देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद ३१ मार्च रोजी संपेल. कोविड -१९ जागतिक साथीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मार्च मध्ये सुरक्षा परिषदेच्या कार्यसुचीत कोणतीच बैठक नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “मानवी सुरक्षेवर अशा गंभीर मार्गाने परिणाम घडविण्याच्या विषयावर परिषद मौन दर्शविते. आमच्या काळातील आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने ते नक्कीच योग्य नाही.”
युनायटेड नेशन्समधील चीनचे राजदूत झांग जुन यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा परिषदेने गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित केली आणि लिबियातील यूएन कोऑपरेशन मिशनच्या कामावर चर्चा केली.