नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र परिषद सुरक्षा परिषद कोरोना विषाणूवर गुरुवारी चर्चा करण्यासाठी एक सत्र आयोजित करणार आहे. आतापर्यंत कोरोना संदर्भात ( यूएनएससी) मध्ये एकदाही चर्चा झाली नाही. कारण ३१ मार्चपर्यंत यूएनएससीचे अध्यक्षपद चीनकडे होते.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत जगभरात ७४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ लाखापेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या डॉमिनिकन रिपब्लिक परिषदेचे अध्यक्ष म्हणाले कि, युएनएससीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रकरणांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्याचे ठरले आहे.
गुरुवारी या अधिवेशनात यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेसही सहभागी होतील. यापूर्वी डॉमिनिकन रिपब्लिकचे विशेष दूत जोसे सिंगर यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, कोरोना विषाणूच्या साथीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाची पहिली बैठक पुढच्या आठवड्यात होऊ शकते.एप्रिल महिन्याचे अध्यक्षपद डोमिनिकन रिपब्लिक देशाकडे आहे. गेल्या महिन्यात अध्यक्षपद चीनकडे होतो त्यामुळे एकही बैठक होऊ शकली नाही.