sharad pawar । यंदाच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाची बैठक बोलवली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,रोहित पवार,अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. ही बैठक तब्बल दोन तास चालली. या बैठकीवरून लवकरच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या सर्व चर्चांवर आता शरद पवार गटाचे नेते, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्या आदेशाने पक्षाची भूमिका मांडली आहे.
माध्यमांशी बोलतांना प्रशांत जगताप म्हणाले,’आज सकाळी बैठकीत सुप्रिम कोर्टाच्या निकालावर चर्चा झाली. शरद पवार गटाचे काँग्रेस मध्ये विलीगीकरण होणार नाही. ते पुढे म्हणाले ज्यांना पवार साहेब यांची भीती आहे ते अफवा पसरवून मोकळे झाले, तसेच या बैठकीत येत्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजना बाबत चर्चा करण्यात आहे.
‘पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू असतांना नेते मंगलदास बांदल यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चाना दुजोरा दिला आहे. यावर प्रशांत जगताप पुढे म्हणाले, ते शरद पवार गटाचे नेते नाही.’