Indian Premier League 2024 (Live Cricket Score, GT vs RCB) : आयपीएल 2024 मध्ये आजही दोन सामने खेळवले जाणार आहेत. सुपर संडेचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील. आरसीबीने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. तर गुजरात टायटन्स कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.
GT vs RCB : दोन्ही संघाचं प्लेइंग 11 खालीलप्रमाणे-
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल.
इम्पॅक्ट सब : अनुज रावत, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, आकाश दीप, विजयकुमार वैश.
Guess who’s back! 🤩 pic.twitter.com/BLhxmPQ9P3
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 28, 2024
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.
इम्पॅक्ट सब : संदीप वारियर, शरथ बीआर, मानव सुथार, दर्शन नळकांडे, विजय शंकर.
आयपीएलमध्ये गुजरात आणि आरसीबी यांच्यातील हेड टू हेडबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. या कालावधीत आरसीबीने केवळ एकच सामना जिंकला आहे. गुजरातने दोनदा विजय मिळवला आहे.
गुजरातने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत, ज्यात 4 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तर आरसीबीने आतापर्यंत 9 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. आरसीबी पॉइंट टेबलमध्ये तळाच्या 10व्या स्थानावर आहे.