Sunetra Pawar | Criket | Viral video – देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात जोरदार लढत होत आहे. गेल्या सहा महिन्यांत बारामतीचे होम ग्राउंड ढवळून निघाले आहे. सध्या ही लढाई अटीतटीवर येऊन ठेपली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी काकांशी फारकत घेऊन महायुतीचा रस्ता धरला. त्यानंतर बारामती लोकसभेतील समीकरणे बदलून गेली आहेत. अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होताना बारामती, इंदापूर, दौंडचे शिलेदार हे त्यांच्यासमवेत गेले आहेत.
त्यामुळे बारामती, इंदापूर, दौंडची राजकीय ताकद ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. तीन तालुक्यांत सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीतील मातब्बर नेत्यांची फौज आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी संपूर्ण शरद पवार गट उभा आहे.
दरम्यान, पुण्यातील आंबेगाव येथे सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू असताना सुनेत्रा पवार यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सुनेत्रा पवार या बारामतीतील महायुतीच्या उमेदवार असून प्रचारादरम्यान, सुनेत्रा पवार यांनी जोरदार फटेकाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
सुनेत्रा पवार यांच्या क्रेकेटच्या मैदानात फटकेबाजीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात त्याची चर्चा आहे. नेटकरी देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत.