Mumbai Indians, Luke Wood Unwanted Record : आयपीएल 2024 मधील 43 वा सामना गेल्या शनिवारी (27 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईला 10 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाबरोबरच मुंबईचा वेगवान गोलंदाज ल्यूक वुडनेही आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) शानदार गोलंदाजी करणारा ल्यूक वुड आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.
पीएसएलमध्ये चमकदार गोलंदाजी केल्यानंतर वुड आयपीएलमध्ये आला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फच्या जागी मुंबईने त्याचा संघात समावेश केला. पण आता त्याने मुंबईसाठी सर्वात महागडा गोलंदाज होण्याचा लाजिरवाणा विक्रम नावावर केला आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी वुडची चांगलीच धुलाई केली.
वुडने 4 षटकात एकूण 68 धावा दिल्या. या दरम्यान त्याला फक्त 1 विकेट मिळाली. वुडने दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाचा विक्रम मोडला. याच मोसमात हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मफाकाने 66 धावा दिल्या होत्या. आफ्रिकन वेगवान गोलंदाजाचा तो पदार्पणाचा सामना होता. आता मफाकाचा नकोसा विक्रम मोडत वुड मुंबईचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सचे सर्वात महागडे गोलंदाज…
4 षटकात 68 धावा – ल्यूक वुड वि दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, 2024
4 षटकात 66 धावा – क्वेना माफाका विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद, 2024
4 षटकात 58 धावा – लसिथ मलिंगा विरुद्ध पंजाब किंग्ज, इंदूर, 2017
4 षटकांत 57 धावा – डॅनियल सॅम्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ब्रेबॉर्न 2022.
इंग्लंडसाठी ल्यूक वूडची कारकिर्द…
मुंबईसाठी आयपीएल खेळणारा ल्यूक वुड इंग्लंडकडून पांढऱ्या चेंडूने क्रिकेट खेळतो. जरी तो इंग्लंडचा नियमित भाग नसला तरी. त्याने आतापर्यंत 2 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याला आतापर्यंत वनडेत यश मिळालेले नाही. याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 5 डावात गोलंदाजी करताना 21.75 च्या सरासरीने 8 विकेट्स घेतल्या. या कालावधीत त्याने 9.66 च्या इकॉनॉमीने धावा दिलेल्या आहेत.