Maharashtra Politics| माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आज माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्यानिमित्त अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे माढयात आणखी एक ट्वविस्ट पाहायला मिळू शकतो.
अभिजित पाटील भाजपसोबत गेले तर शरद पवार यांच्यासोबत माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे याना मोठा फटका बसू शकतो. अभिजित पाटील यांची माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे.
जर त्यांनी भाजपात प्रवेश केला, तर याठिकाणी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. आज देवेंद्र फडणवीस हे अकलूज येथील मोहिते पाटील कुटुंबातील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या घरी चहाला जाणार असून त्यांना भाजपच्या व्यासपीठावर आणणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत.
अभिजित पाटलांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यामागच कारण काय? Maharashtra Politics|
दोन दिवसांपूर्वी राज्य सहकारी शिखर बँकेने अभिजित पाटील अध्यक्ष असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सर्व गोदाम सील करून ताब्यात घेतले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे बँकांचे 450 कोटी रुपये थकलेले असून यासाठी न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर बँकेने कारखाना सील केला.
सध्या शेतकऱ्यांची उसाची बिले द्यायची असून नियमानुसार हे सील काढायला किमान 25 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यासाठी 100 कोटी पेक्षा जास्त रकमेची आवश्यकता असून सध्या कारखान्याकडे पैसेच नसल्याने जप्तीची कारवाईमधून सुटका ककरण्यासाठी अभिजित पाटील यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, माढ्यात 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता त्यामुळे अभिजित पाटील नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
“एनडीएचा मार्ग सोपा नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने…”; छगन भुजबळ यांचे विधान