Lok Sabha Election 2024| कोरबा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सरोज पांडे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी नोटीस बजावली आहे. बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्त्व स्वीकारल्याबद्दल सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी नोटीस बजावली आहे.
सोमवारपर्यंत नोटीसला उत्तर न दिल्यास धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा खर्च उमेदवाराकडून वसूल केला जाईल आणि तो आचारसंहितेचा भंग मानला जाईल. खरे तर चिरमिरी येथे आयोजित कथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी आयोजकांमध्ये भाजप उमेदवार सरोज पांडे आणि आरोग्यमंत्री श्यामबिहारी जैस्वाल यांची नावे घेतली होती.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अशोक श्रीवास्तव यांनी सरोज पांडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली राजकीय प्रचार केला जात असल्याचा त्यांचा आरोप होता. हा आचारसंहितेचा भंग आहे. यानंतर सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी सरोज पांडे यांना नोटीस पाठवली आहे. या कथेच्या ठिकाणी भाजपचा प्रचार केला जात होता. त्यामुळे या प्रवचनासाठी प्रायोजक म्हणून केलेला सर्व खर्च निवडणूक खर्चात धरला जाणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे सरोज पांडे यांची अडचणीत वाढ झाली आहे.
सरोज पांडे काय म्हणाल्या ? Lok Sabha Election 2024|
निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर लोकसभेच्या उमेदवार सरोज पांडे प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही नोटीसला उत्तर देऊ, काँग्रेस पक्षाध्यक्षांनी केलेला आरोप निराधार आहे. नेहमी विषय बदलण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा आपण थेट लढतीत जिंकू शकत नाही, तेव्हा आपण अशा प्रकारे लढतीला वळण देऊ लागतो. त्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ, असे सरोज पांडे म्हणालेत.
हेही वाचा:
निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुडेंचे फोटो, भाजपनं केली ‘तक्रार’