Indian Premier League 2024 (Live Cricket Score, GT vs RCB) : आयपीएल 2024 मध्ये आजही दोन सामने खेळवले जाणार आहेत. सुपर संडेचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
🚨 Toss Update 🚨@RCBTweets will chase against @gujarat_titans
Follow the Match ▶️ https://t.co/SBLf0DonM7#TATAIPL | #GTvRCB pic.twitter.com/T9333ndEOR
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
आयपीएलमध्ये गुजरात आणि आरसीबी यांच्यातील हेड टू हेडबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. या कालावधीत आरसीबीने केवळ एकच सामना जिंकला आहे. गुजरातने दोनदा विजय मिळवला आहे.
गुजरातने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत, ज्यात 4 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तर आरसीबीने आतापर्यंत 9 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. आरसीबी पॉइंट टेबलमध्ये तळाच्या 10व्या स्थानावर आहे.