Lok Sabha Election 2024 । दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे.
तर उमेदवारी अर्ज भरताना भाजप उमेदवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी महायुतीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर दुसरीकडे निलेश लंके यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन न करत दिव्यांग बांधवाच्या हस्ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. लंकेच्या साधेपणा चांगलाच चर्चेत आला होता.
अशात आता निलेश लंके यांच्या पोस्टरवरुन राजकारण तापले आहे. निलेश लंके यांच्या पोस्टरवर गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि राजू राजळे (Raju Rajale) यांचे फोटो टाकल्याने वाद निर्माण झाला आहे.आज लंके यांच्या प्रचारार्थ शेवगावमध्ये शरद पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे. मात्र पोस्टरवर गोपीनाथ मुंडे आणि राजू राजळे यांचे फोटो लावल्यामुळे ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे.
या पोस्टरची तक्रार भाजपने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. भाजप नेत्यांचे फोटो वापरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा मविआकडून प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
हे वाचले का ? संजय राऊत यांचा दावा; म्हणाले, ‘उज्ज्वल निकम उमेदवार असले तरी…’