Sonia Gandhi Birthday : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आज आपला 77 वा वाढदिवस साजरा करत आहेत.त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनियांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ रोजी इटलीत झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांना ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी एक पोस्ट शेअर करत, ‘सोनिया गांधीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो.” असे म्हटले आहे. तसेच पंतप्रधानांव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल, शशी थरूर आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही माजी काँग्रेस अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांना शुभेच्छा देताना म्हटले, “सोनिया गांधी उपेक्षित लोकांच्या हक्काच्या सतत समर्थक आहेत. तसेच पुढे बोलताना, ‘उपेक्षितांच्या हक्कांच्या समर्थक असण्याबरोबरच त्या अत्यंत दयाळूपणा, धैर्याने आणि निःस्वार्थ बलिदानाने संकटांशी लढण्याचे मूर्तिमंत रूप आहे. मी त्याला दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.” असे त्यांनी म्हटले.
केसी वेणुगोपाल यांनी शुभेच्छा देताना, “सार्वजनिक सेवा आणि समाजातील गरीब आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी सोनिया गांधींच्या वचनबद्धतेने कोट्यवधी लोकांची मने जिंकली आहेत. ‘त्यांचा जीवन प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत आव्हानात्मक काळात त्यांनी अत्यंत संयमाने काँग्रेसचे नेतृत्व केले आणि सर्वांचे कल्याण आणि देशाचा जलद विकास करणाऱ्या UPA सरकारच्या शिल्पकार होत्या.असे म्हटले आहे.