Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. जास्तीत जास्त मते आपल्या झोळीत पाडण्यासाठी ठिकठिकाणी सभांचे आयोजन केले जात आहे. अशातच कागलमधील महायुतीच्या प्रचार सभेत भलतंच काहीतरी घडलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ पोस्ट करुन टोला लगावला आहे.
नेमंक काय घडलं ?
भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सभेला जमलेल्या लोकांना विचारले की, तुम्ही हा देश कुणाच्या हातात देणार आहात? नरेंद्र मोदींच्या की राहुल गांधींच्या? यावेळी सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी समोरुन उस्फूर्तपणे उत्तर दिले राहुल गांधींच्या हातात देणार. यावेळी व्यासपिठावर उपस्थित असलेल्या नेत्यांना व मंत्री हसन मुश्रीफ यांना व ज्यांनी प्रश्न विचारला त्या शौमिका महाडिक यांना देखील हसू आवरता आले नाही. सर्वत्र एकच हाश्या पिकला. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चांगलीच अडचण निर्माण झाली. त्यानंतर पुन्हा शौमिका महाडिक यांनी विषय समजावून सांगत घडलेला प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यासपिठावरील नेत्यांच्या हसण्यावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
सभा स्थळ :-कागल ,कोल्हापूर अर्थातच राजर्षी शाहूंची नगरी
भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी सभेला जमलेल्या श्रोत्यांना विचारलं तुम्ही हा देश कुणाच्या हातात देणार आहात नरेंद्र मोदींच्या की राहुल गांधींच्या?
आणि
समोरुन उस्फूर्तपणे उत्तर आले राहुल… pic.twitter.com/SxUxjqhK5C— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 1, 2024
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट –
सभा स्थळ :-कागल ,कोल्हापूर अर्थातच राजर्षी शाहूंची नगरी, भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी सभेला जमलेल्या श्रोत्यांना विचारलं तुम्ही हा देश कुणाच्या हातात देणार आहात नरेंद्र मोदींच्या की राहुल गांधींच्या? आणि समोरुन उस्फूर्तपणे उत्तर आले राहुल गांधींच्या हातात देणार. ह्यावेळी आमचे पूर्वीचे सहकारी हसन मुश्रीफ यांना देखील हसू आवरता आले नाही. त्यांनी देखील खळखळून दाद देत आपण हारत असल्याची कबुली दिली. कहो दिलं से इंडिया फिर से…