Rajinikanth : दक्षिणेकडील राज्यात मिचाँग चक्रीवादळाने (Michaung cyclone) धुमाकुळ घातला आहे. चेन्नई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागांमध्ये पुराचे पाणी शिरले असून नागरिकांची एकच धांदल उडाली आहे. या भागात मोठे आर्थिक नुकसान झाले याशिवाय जीवितहानी देखील झाल्याचे सांगितले जात आहे. मिचाँग चक्रीवादळाचा फटका अभिनेते रजनीकांत यांनाही बसला आहे. चेन्नईतील पोएस गार्डन या भागातील रजनीकांत (Rajinikanth) यांच्या बंगल्यात पुराचे पाणी शिरले आहे. त्यांच्या बंगल्याबाहेरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत रजनीकांत यांच्या घराजवळ पाणी साठल्याचं दिसतं आहे. तसंच घरासमोरचा रस्ताही पाण्याखाली गेला आहे. त्यांच्या घराचा व्हिडीओ त्यांच्या एका चाहत्याने अपलोड केला आहे. बंगल्यात पाणी शिरले असले तरी रजनीकांत आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित आहे. रजनीकांत हे सध्या थलाइवर १७० या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहेत. याच सिनेमाच्या चित्रीकरणासाठी ते बाहेर होते. हे चक्रीवादळ येण्यापूर्वीच रजनीकांत त्यांच्या कुटुंबियांसह दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी शिफ्ट झाल्यांच सांगण्यात येत आहे.
போயஸ் கார்டன் – ரஜினி வீட்டை சூழ்ந்த மழைவெள்ளம்!#ChennaiRains2023 #ChennaiHelps #ChennaiRains #tnrains #WhatNonsense_is_this_DMK #Michaungcyclone #ChennaiFlood #Pallikaranai #ChennaiFloods2023 #Tamilnadu #Velachery #Stalin #Thoraipakkam #vannarapettai #Tambaram #chennaicyclone pic.twitter.com/o7RAv4kXDm
— Savukku Media (@Savukkumedia) December 6, 2023
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता आमिर खान देखील चेन्नईच्या पुरात अडकला होता. अभिनेता विष्णू विशाल याने चेन्नई अग्निशमन दलाने केलेल्या त्याच्या बचावाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये आमिर खानला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र बचाव पथकांच्या मदतीनं आमिरसह अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते.