Ashadhi Wari 2024 – संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमीला (दि. 29 जून) शनिवारी सायंकाळी 4 वाजता माउलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. पहिला मुक्काम आळंदी येथेच दर्शन मंडप इमारत (गांधी वाडा) येथे असेल. 30 जूनला पालखी सोहळा सकाळी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. 30 जून आणि 1 जुलैला पालखी सोहळ्याचा मुक्काम पुण्यात असेल, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवस्थानकडून देण्यात आली आहे. (Ashadhi Wari 2024 : Schedule of Sant Dnyaneshwar Maharaj Ashadhi Wari Palkhi Ceremony Announced; Know important dates)
देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथे दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा 2 जुलैला सकाळी सासवड मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. 2 जुलै आणि 3 जुलै असे दोन दिवस पालखी सोहळा सासवड मुक्कामी असेल.
पालखी सोहळ्याचा 4 जुलैचा मुक्काम जेजुरी, 5 जुलै वाल्हे, 6 आणि 7 जुलै लोणंद, 8 जुलै तरडगाव, 9 जुलै फलटण, 10 जुलै बरड, 11 जुलै नातेपुते, 12 जुलै माळशिरस, 13 जुलै वेळापूर, 14 जुलै भंडीशेगाव, 15 जुलै वाखरी, तर आषाढ शुद्ध दशमीला 16 जुलै पालखी सोहळा पंढरपूर मुक्कमी पोहोचेल. 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. 20 जुलैपर्यंत पालखी सोहळा पंढरपूरात राहील. त्यानंतर 21 जुलैला पालखीचा परतीचा प्रवास सुरु होईल. 30 जुलैला पालखी परतीचा प्रवास करुन आळंदी मुक्कामी पोहोचेल.
Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; महत्वाच्या तारखा जाणून घ्या..#ashadhiwari2024 pic.twitter.com/V7MHEiuMs0
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) May 2, 2024
महत्वाच्या तारखा –
प्रस्थान – 29 जून
आषाढी एकादशी – 17 जुलै
येथे दोन दिवस मुक्काम –
पुणे – 30 जून आणि 1 जुलै
सासवड – 2 आणि 3 जुलै
लोणंद – 6 आणि 7 जुलै
रिंगण कधी आणि कुठे ?
– 8 जुलै – चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण
– 12 जुलै – पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण
– 13जुलै – खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण
– 14 जुलै – ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण, (टप्पा येथे बंधुभेट संत सोपानदेव पालखी भेट)
– 15 जुलै – बाजीरावची विहीर येथे दुसरे उभे रिंगण, चौथे गोल रिंगण
– 16 जुलै – पादुकांजवळ तिसरे उभे रिंगण
6 जुलै – नीरा स्नान
14 जुलै – बंधू भेट
परतीचा प्रवास –
20 जुलैपर्यंत सोहळा विठ्ठल नगरीत विसावेल. 21 जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान, गोपाळपूर काला व श्री विठ्ठल रुक्मणी भेट , पादुकां जवळ विसावा व सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे. परतीचा प्रवास 21 जुलै वाखरी, 22 जुलै वेळापूर, 23 जुलै नातेपुते, 24 जुलै फलटण, 25 जुलै पाडेगाव, 26 जुलै (श्रींचे नीरा स्नान)वाल्हे, 27 जुलै सासवड, 28 जुलै हडपसर, 29 जुलै (भवानी पेठ)पुणे, 30 जुलै आळंदी, 31 जुलै आळंदी नगरप्रदक्षिणा, हजेरी मारुती मंदिर नारळ प्रसाद, श्री माऊलीं मंदिर.