Priyanka Chaturvedi | Prajwal Revanna । Chitra Wagh | Thackrey Group । Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी पार पडणार आहे.
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान पार पडणार आहे.अशात महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना दिसत आहे.
अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहे. ‘अदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड च्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं एक पात्र हा एक पॉर्न स्टार आहे.
आणि तोच या जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार ? आणि हाच इसम लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतोय.
या जाहिरातीत वडिलांच्या भूमिकेत जो व्यक्ती आहे , त्याचे ‘उल्लू’ ॲपवरील एका वेबसीरिजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन त्यांनी ( ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली ‘ असा सवाल वाघ यांनी विचारला.
यावर आता प्रत्युतर देत राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रज्वल रेवन्ना प्रकरणावरून भाजपावर निशाणा साधला. तुम्ही तर पॉर्न कँडिटेट उभा केलाय त्यावर तुमचं काय म्हणणं आहे ? प्रज्वलबद्दल पंतप्रधान काहीच का बोलत नाहीत ?
अमित शाह हासनमध्ये का नाही गेलेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजपनं प्रज्वल याला परदेशात जायला मदत केली, असा आरोपही त्यांनी केला. जरा लाज वाटू द्या आणि बुडून मरा तुम्ही, असं म्हणत चतुर्वेदी यांनी भाजपावर टीका केली आहे.
प्रज्वल रेवन्ना यांचं प्रकरण नेमकं काय ?
कर्नाटकातील भाजपा-जेडीएस आघाडीचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना वादात अडकला आहे. त्याचे काही आपत्तीजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल. हे सर्व अश्लील व्हिडीओ आहेत.
या व्हिडीओमुळे कर्नाटकातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या व्हिडीओमध्ये कथितरित्या प्रज्वल दिसत आहे. जनता दल सेक्युलरचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी या व्हिडीओद्वारे महिलांना ब्लॅकेमेल केल्याचा आणि त्यांचं शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यांच्या घरातील एका मोलकरणीनेच हा प्रकार उघडकीस आणला आणि एकच खळबळ माजली. दरम्यान हा प्रकार उघडकीस येताच रेवन्ना हे देशाबाहेर पळून गेल्याचे समोर आले. ते जर्मनीमध्ये असल्याचे वृत्त आहे.