Bollywood News अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि इमरान हाश्मी यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली. ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटातील तिचा किसिंग सीन बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सीनपैकी एक आहे. तनुश्रीने अलीकडेच इम्रानसोबतच्या तिच्या किसिंग सीनबद्दल सांगितले आणि त्याला ‘विचित्र’ म्हटले. त्यांच्यात ऑफ स्क्रिन कोणतीही केमिस्ट्री नसल्याचंही यावेळी तिने सांगितले.
तनुश्री दत्ता आणि इमरान हाश्मी यांच्यात चित्रपटामध्ये चित्रित केलेले ते किसींग सिन त्यावेळी चर्चेचा विषय ठरले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने किसींगसिन बद्दल सांगितले की, ‘माझ्यासाठी इम्रान पहिल्या दिवसापासून नेहमीच एक अभिनेता आहे. मी त्याच्यासोबत तीन चित्रपट केले. चॉकलेटमध्येही आम्ही किसिंग सीन शूट केला, पण त्यांनी तो सिन सिनेमात ठेवला नाही. किसींग सिन पहिल्यांदा करतांना खूप विचित्र वाटले. दुसऱ्यांदा थोडं कमी अस्ताव्यस्त वाटलं. कारण वैयक्तिकरित्या, वास्तविक जीवनात आमची एकमेकांशी कोणतीही केमिस्ट्री नाही. त्याच्याकडे किसर-बॉय इमेज होती चित्रपटाची त्यावेळी किसिंग सीनची डिमांड होती आणि त्यावेळी ती आम्ही पूर्ण केली.’
तनुश्री दत्ता आणि इमरान हाश्मी यांनी ‘आशिक बनाया आपने’, ‘चॉकलेट: डीप डार्क सिक्रेट्स’ आणि ‘गुड बॉय, बॅड बॉय’ या तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तनुश्री दत्ताने 2005 मध्ये ‘आशिक बनाया आपने’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर लगेचच ‘रकीब: रिव्हल्स इन लव्ह’, ‘ढोल’, ‘सास बहू और सेन्सेक्स’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ‘हम ने ली है शपथ’ (2013) हा त्याचा शेवटचा चित्रपट होता.