Amit Shah | Yogi Adityanath | Deep Fake Video – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय नेत्यांचे डीप फेक व्हिडिओ समोर येत आहेत. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डीप फेक व्हिडिओ छेडछाड करून व्हायरल केला गेला होता.
त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशच्या विशेष कृती पथकाने अर्थात एसटीएफने त्वरित कारवाई करत एकाला अटक केली आहे.
१ मे रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ व्हायरल केला गेला होता. त्यात भाजप हटाओ, देश बचाओचा नारा देतानाच पुलवामा हल्ल्यातील वीर जवानांच्या पत्नींच्या मंगळसूत्राबाबत दावे केले गेले होते.
हे व्हिडिओ खरे आहेत आणि खरे असतील तर जनता अंधभक्त आहे अशी पोस्ट टाकतानाच योगी, उत्तर प्रदेश भाजप आणि पंतप्रधान यांनाही टॅग करण्यात आले होते.
नोएडातील श्याम गुप्ता नामक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे एआयच्या मदतीने व्हिडिओ तयार करण्यात आला असल्याचेही तपासात आढळून आले आहे.
दरम्यान, अमित शहांच्या प्रकरणात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून अन्य नेत्यांचीही चौकशी सुरू आहे. आठ राज्यांतील १६ जणांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.