Sangali Lok Sabha Election 2024| सांगली लोकसभा मतदार संघातील जागेसाठी महाविकास आघाडीत वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस सांगलीची जागा मिळण्यासाठी आग्रही होती. विशाल पाटील काँग्रेसकडून येथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र ही सांगलीची जागा उद्धव ठाकरेला मिळाल्याने काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली.
काय म्हणाले शरद पवार? Sangali Lok Sabha Election 2024|
यावर आता शरद पवार यांनी सांगलीच्या महाविकास आघाडीतील जागेबाबत गौप्यस्फोट केला आहे. ‘राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवताना कुणी जास्त जागा मागायच्या नाहीत असे ठरले होते. ज्या पक्षाचा उमेदवार तेथे निवडून येईल ती जागा त्या पक्षाला द्यायची या सुत्रानुसार उमेदवार निश्चित करण्यात आले. मात्र, याला सांगली लोकसभा मतदारसंघ अपवाद ठरला. येथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरुनच समजली.” मात्र एकदा निर्णय घेतला म्हंटल्यावर आम्ही या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले.
सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाला सोडल्याने काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी तर आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महाविकास आघाडीसमोर अडचण निर्माण झाली आहे.
सांगलीत तिहेरी लढत Sangali Lok Sabha Election 2024|
महायुतीचे संजय पाटील, ‘मविआ’चे चंद्रहार पाटील, अपक्ष विशाल पाटील यांच्या प्रामुख्याने लढत होणार आहे. भाजपकडून तिसऱ्यांदा संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यत आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी लढत होत आहे. दरम्यान, सांगली लोकसभेची निवडणूक विशाल पाटील यांनी 2019 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती. मात्र, तेव्हा त्यांचा पराभव झाला होता.
हेही वाचा:
हेमंत गोडसेंचे नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन; आज दाखल करणार उमेदवारी अर्ज